Ahmednagar Crime News : गावठी पिस्तुलासह एकास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime: गावठी पिस्तुलासह एकास अटक

नेवासे : नेवासे खुर्द येथील औदुंबर चौकात पोलिसांनी मंगळवारी (ता. १७) रात्री अकरा वाजता गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या युवकास अटक केली. त्याच्याकडून गावठी पिस्तुलासह नऊ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.(Ahmednagar Crime News)

औदुंबर चौकात राहत असलेल्या लता किशोर कुंभकर्ण यांनी आपला मुलगा सागर हा पत्नी प्रांजल व तीन मुलींना दमदाटी, मारहाण व जिवे मारण्याची धमकी देत असल्याची खबर पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक विजय करे व पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.

विश्वासात घेऊन आरोपीकडून माहिती मिळाल्यानंतर तिसऱ्या मजल्यावरील झोपण्याच्या खोलीतून गावठी पिस्तूल व काडतुसे जप्त केली. आरोपी सागर कुंभकर्ण यास अटक करण्यात आली आहे. श्‍याम गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. तपास हवालदार तुळशीराम गिते करीत आहेत.