esakal | नगर बनणार देशात नंबर वन, पालकमंत्री मुश्रीफ यांनीच तसं ठरवलंय
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmednagar will be number one in the country

नगर शहरासह जिल्ह्याला देशात "नंबर वन' बनवू,'' अशी ग्वाही पालकमंत्री तथा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

नगर बनणार देशात नंबर वन, पालकमंत्री मुश्रीफ यांनीच तसं ठरवलंय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर ः नगरमध्ये राज्याचे राजकारण हादरवून सोडणारे नेते आहेत. आता तर पवार घराण्यातील सदस्य आमदार रोहित पवार यांचाही कर्जत-जामखेडच्या माध्यमातून एंट्री झाली आहे. त्यामुळे अर्थातच नगरचे वर्चस्व राज्यात आहे. परंतु शहराची अवस्था दयनीय आहे. जिल्ह्यातही विकासाचा असमतोल आहे. नगरला एक मोठं खेडं आजही म्हणलं जाते. आता या नगरला वर नेण्याचा चंग पालकमंत्री मुश्रीफ यांनी बांधला आहे. बघू या काय होतंय.

""जिल्ह्याला पर्यटनाच्या दृष्टीने ऐतिहासिक वारसा लाभला आहे. नगर शहर व जिल्ह्यात पर्यटन विकासास मोठा वाव आहे. नगर शहरासह जिल्ह्याला देशात "नंबर वन' बनवू,'' अशी ग्वाही पालकमंत्री तथा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हा परिषदेतर्फे आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कारांचे येथील सहकार सभागृहात मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते वितरण झाले. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले होत्या. 

(स्व.) आर. आर. पाटील यांच्या आठवणींना उजाळा देताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, ""आर. आर. पाटील यांनी अतिशय कष्टातून स्वत:चे नेतृत्व उभे केले. त्यांचे कार्य उत्तुंग असून, ते चिरकाल स्मरणात राहणारे आहे. त्यांच्या कार्याचे सगळ्यांना स्मरण व्हावे, यासाठी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त ग्रामपंचायतींना पुरस्कार देण्यात येतात. गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायतींना 15व्या वित्त आयोगातून मोठा निधी मिळत आहे. पाणीपुरवठा आणि स्वच्छता, तसेच इतर विकासकामांसाठी हा निधी आहे. त्याचा योग्य विनियोग करून विकास साधावा. या आयोगाचा 4368 कोटींचा पहिला हप्ता राज्यातील ग्रामपंचायतींना उपलब्ध दिला आहे. येत्या पाच वर्षांत 29 हजार कोटी रुपये ग्रामपंचायतींना विकासासाठी मिळणार आहेत.''  संपादन - अशोक निंबाळकर