राशीन : गेल्या आठवडाभरापासून राशीनसह परिसरात गुलाबी थंडीचे आगमन झाले. सकाळी आणि संध्याकाळनंतर रात्रभर वातावरणातील गारठा चांगलाच जाणवत असल्याने ही थंडी सर्वांनाच हुडहुडी भरवित आहे. .सोनईत गुटखा, मावा विक्री जोमात .भीमा नदीकाठच्या खेड, शिंपोरा, औटेवाडी, बाभूळगाव, गणेशवाडी, करमनवाडी, बारडगाव सुद्रिक, भांबोरा आदी गावात थंडीचा कडाका अधिक जाणवत आहे. बागायती पिके आणि भीमा नदीच्या फुगवट्याचे पाण्यामुळे त्यात भर पडत आहे. गव्हाच्या पिकास ही थंडी पोषक असल्याचे शेतकरी सांगत आहेत. .थंडीच्या आगमनाला राशीनच्या आठवडे बाजारात मंगळवारी (ता.२६) उबदार रजई, स्वेटर, कान टोप्या विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली होती. त्यास ग्राहकांचा चांगला प्रतिसाद होता. .तरुणाईकडून स्वीट शर्ट, हुडी, जर्किनला खास मागणी होती. कुडकुडायला लावणाऱ्या थंडीचे आगमन झाल्याने घरात ठेवणीत ठेवलेले स्वेटर, मफलर, जर्किन शालेय विद्यार्थ्यांसह अनेकांच्या अंगावर दिसू लागले आहेत..Ahmednagar Crime : खोटी माहिती दिली अन् गजाआड गेला. रात्रपाळीतील कामगार, वॉचमन, हॉटेल व्यावसायिक आणि ग्रामस्थ थंडीमुळे शेकोटीच्या उबेला बसून शेकताना दिसत आहेत. थंडीच्या आगमनामुळे तरुण व्यायामासाठी सज्ज झाला आहे. पोहणे, सायकल चालवणे, फिरायला आणि जिमला जाण्यासाठी मित्रा-मित्रांचे ग्रूप तयार झाले आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.