
कोरोनामुळे राज्य सरकारच्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेचे कामकाज पाच टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू होते. त्यानंतर हळूहळू ते वाढविण्यात आले.
नगर ः जिल्हा परिषदेत अनेक फायलींची पेंडन्सी असल्याने, प्रशासनाने सुटीच्या दिवशीही कामकाज करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, उद्या (शनिवारी) कामकाज होणार आहे.
कोरोनामुळे राज्य सरकारच्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेचे कामकाज पाच टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू होते. त्यानंतर हळूहळू ते वाढविण्यात आले. मात्र, एकामागे एक कर्मचारी कोरोनाबाधित निघू लागल्यानंतर जिल्हा परिषदेचे कामकाज बंदच ठेवण्यात आले. त्यामुळे अनेक कामे प्रलंबित राहिली आहेत. त्यामुळे फायलींचा निपटारा करण्यासाठी प्रशासनाने सुटीच्या दिवशी कामकाज करण्याचा निर्णय घेतला आहे.
विभागीय आयुक्त बुधवारी (ता. 9) नगर दौऱ्यावर येणार आहेत. ते जिल्हा परिषदेतील कामकाजाचा आढावा घेणार आहेत. त्या दृष्टीनेही प्रशासनाचे नियोजन सुरू आहे. हे कामकाज उरकण्यासाठी प्रशासनाने शनिवारीही कामकाज सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, उद्या जिल्हा परिषदेचे कामकाज नियमित वेळेत चालणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषद मुख्यालयासह पंचायत समित्यांची कार्यालयेही सुरू राहणार आहेत.
याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) वासुदेव सोळंके म्हणाले, की जिल्हा परिषदेतील पेंडन्सी पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने सुटीच्या दिवशी कामकाज करण्याचा निर्णय घेतला आहे.