Ahmednager : बँक खात्यांना नाही ‘आधार’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

KYC

Ahmednager : बँक खात्यांना नाही ‘आधार’

अहमदनगर : पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दर तीन महिन्यांनी दोन हजार रुपये दिले जात आहेत. शेतकऱ्यांना या योजनेच्या लाभासाठी बँकेतील खात्याला आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक जोडणे (ई-केवायसी) बंधनकारक करण्यात आले आहे. या योजनेचे जिल्ह्यात ६ लाख ३७ हजार २५८ लाभार्थी आहेत. त्यापैकी ५ लाख १६ हजार २४९, म्हणजेच ८१ टक्के लाभार्थ्यांनी ई-केवायसी जोडणी पूर्ण केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये पंतप्रधान किसान सन्मान योजनेची सुरवात उत्तर प्रदेशमध्ये केली होती. गरीब आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीच्या मशागती, बी-बियाणे खरेदी, खते घेण्यासाठी मदत करणे होता. केंद्र सरकार वर्षातून तीन वेळा दोन हजार रुपयांच्या हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना एकूण सहा हजार रुपयांची आर्थिक मदत देते.

तालुकानिहाय लाभार्थ्यांची संख्या (कंसात ई-केवायसी) ः नगर ३८ हजार ८९८ (२९ हजार ९९६), नेवासे- ५६ हजार ३०१ (४८ हजार १५३), श्रीगोंदे- ५८ हजार ४१० (४८ हजार ५४), पारनेर- ५९ हजार १४६ (४७ हजार ६०), पाथर्डी- ४७ हजार ५९ (३७ हजार ९११), शेवगाव- ५८ हजार ४९१ (४६ हजार १२६), संगमनेर - ६५ हजार ७२१ (५५ हजार ६३५), अकोले- ३९ हजार ६९२ (२८ हजार ९६३), श्रीरामपूर- २४ हजार १४ (२१ हजार २९०), राहुरी - ४२ हजार ९६१ (३५ हजार ३७७), कर्जत- ५१ हजार ४४६ (४१ हजार ५५३), जामखेड- ३४ हजार ४४ (२६ हजार ६७१), राहाता- २७ हजार ८६३ (२१ हजार ९२), कोपरगाव- ३३ हजार २१२ (२८ हजार ३६८).

तालुकानिहाय ई-केवायसी अपूर्ण शेतकरी संख्या (कंसात टक्केवारी) नगर- ८ हजार९०२ (२२), नेवासे- ८ हजार १४८ (१४), श्रीगोंदे- १० हजार ३५६ (१७), पारनेर- १२ हजार ८६ (२०), पाथर्डी- ९ हजार १४८ (१९), शेवगाव- १२ हजार ३६५ (२१), संगमनेर - १० हजार ८६ (१५), अकोले- १० हजार ७२९ (२७), श्रीरामपूर- २ हजार ७२४ (११), राहुरी - ७ हजार ५८४ (१७), कर्जत- ९ हजार ८९३ (१९), जामखेड- ७ हजार ३७३ (२१), राहाता- ६ हजार ७७१ (२४), कोपरगाव- ४ हजार ८४४ (१४).

अशी करा ई-केवायसी प्रक्रिया

पंतप्रधान किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये (सीएससी) बायोमेट्रिक पद्धतीने ई-केवायसी केले जाऊ शकते. ई-केवायसी सीएससीवर शेतकऱ्याच्या बोटांच्या ठशाद्वारे पूर्ण केले जाते. यासोबतच सामाईक सेवा केंद्रावर या कामासाठी लाभार्थी शेतकऱ्याचे आधार कार्ड आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. सेवा केंद्रावर ई-केवायसीची फी १५ रुपये आहे.