Ahmednager : वीज गेली? मिस्ड कॉल द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmednager

Ahmednager : वीज गेली? मिस्ड कॉल द्या

अहमदनगर : पावसाळ्यात वीजप्रवाह वारंवार खंडित होतो. त्याची माहिती देण्यासाठी अनेकदा महावितरण कार्यालयाशी दूरध्वनीद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न नागरिक करतात. मात्र दूरध्वनी न उचलला गेल्याने नागरिकांचा संताप अनावर होतो. आता नागरिकांना फक्त महावितरणच्या टोल-फ्री क्रमांकावर केवळ मिस्ड कॉल द्यायचा आहे. त्यांच्या तक्रारीचे निराकरण त्याद्वारे करण्यात येणार आहे.

महावितरणतर्फे खंडित वीजपुरवठ्याच्या तक्रारीसाठी मिस्ड कॉल सेवा उपलब्ध करून देण्यात आली असून, या क्रमांकात बदल करण्यात आला आहे. ग्राहक नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून, महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या ०२२- ५०८९७१०० या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन आपली तक्रार नोंदवू शकतात. ज्या ग्राहकांनी अद्याप आपले मोबाईल क्रमांक महावितरणकडे नोंदविले नाहीत, ते ग्राहक महावितरण मोबाईल ॲपद्वारे किंवा वरील टोल-फ्री क्रमांकावर फोन करून आपल्या ग्राहक क्रमांकाची नोंद करू शकतात.

वीज खंडित झाली की, नागरिक महावितरण

कार्यालयात दूरध्वनी करतात. संपर्क न झाल्यास किंवा कर्मचाऱ्यांनी दुरुत्तरे केल्यावर महावितरण कार्यालयांवर हल्ले करण्याचाही प्रकार घडले आहेत. ऑनलाइनच्या जगात ग्राहकांना महावितरण कार्यालयात जाऊन समस्या मांडाव्या लागत होत्या. ही बाब लक्षात घेऊन महावितरणने जुन्याच टोल-फ्री क्रमांकांना अधिक अॅक्टिव्ह करण्याचा निर्णय घेतला आहे.

या क्रमांकावर ग्राहक विद्युत पुरवठा खंडित वा आपत्कालीन परिस्थितीच्या तांत्रिक बिघाडाकरिता, तसेच चालू वीजदर, वीजदरातील बदल, वीजदेयकविषयक तक्रारी, नवीन वीजजोडणीसारख्या वाणिज्यविषयक तक्रारींकरिता, तसेच वीजचोरी, नावातील बदल, नादुरुस्त वीज मीटर बदलणे आदी तक्रारी या उपलब्ध क्रमांकावर नोंदवू शकतात.

दोन कोटी ग्राहकांना होणार लाभ

हा टोल-फ्री क्रमांक राज्यातील सुमारे दोन कोटी ८० लाख ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. महावितरणच्या एका टोल-फ्री क्रमांकात बदल करण्यात आला आहे. नवीन क्रमांक १८००-२१२-३४३५ असून, १८००-२३३-३४३५, १९१२ व १९१२० या पूर्वीच्या क्रमांकांत कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.

Web Title: Ahmednager Rain Fragmented Call By Electrcity Deparment Numbar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..