दूध दरासाठी आंदोलन सुरुच राहणार : डॉ. अजित नवले

शांताराम काळे
Tuesday, 21 July 2020

दूधप्रश्नी दुग्ध विकास मंत्री यांनी मंत्रालयात बोलाविलेल्या बैठकीत शेतकऱ्यांना न्याय मिळेल, असे वाटले होते.

अकोले (अहमदनगर) : दूधप्रश्नी दुग्ध विकास मंत्री यांनी मंत्रालयात बोलाविलेल्या बैठकीत शेतकऱ्यांना न्याय मिळेल, असे वाटले होते. मात्र पदरी निराशाच पडल्याने दुध उत्पादक शेतकरी व दूध संघर्ष समिती उद्यापासून आंदोलन तीव्र करणार असल्याची माहिती माकपचे डॉ. अजित नवले यांनी दिली.

दूध प्रश्नाबाबत दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी मंत्रालयात बोलविलेल्या बैठकीमध्ये दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आणि किसान सभेच्या वतीने आम्ही दुग्ध व्यवसाय व शेतकऱ्यांनी मागणी जोरदारपणे मांडली. वेगवेगळ्या संघटनांनी सुद्धा १० रुपये प्रतिलिटर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करा आणि किमान ३० रुपये प्रतिलिटर दर शेतकऱ्यांना मिळेल. यासाठी हस्तक्षेप योजना आणावी याची जोरदार मागणी केली. मात्र ही पहिलीच बैठक होती. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांचे फक्त ऐकून घेऊ दूध उत्पादक संघांच्या मागण्या ऐकून घेऊ आणि त्यानंतर मंत्रिमंडळामध्ये निर्णय करून याबाबत हस्तक्षेपाची योजना अनु अशा प्रकारचा आश्वासन दुग्ध विकास मंत्र्यांनी दिले. त्यामुळे आजच्या बैठकीत या प्रश्नावर कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही.

एक प्रकारची राज्यात शेतकऱ्यांच्या पदरात निराशाच पडल्याने आम्ही या पार्श्वभूमीवर आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका घेतो आहोत. उद्या शेतकरी संघटना आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे घटक यांच्याशी बोलून किसान सभेचा नेत्यांबरोबर बोलू आणि यापुढे आंदोलनाचे काय पवित्रा असेल याबाबतचे विचार तातडीनं आंदोलनाची गोष्ट आम्ही करून जोपर्यंत सरकार हस्तक्षेपाची योजना आनंद नाही आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तातडीने दहा रुपये कसे जातील आणि तीस रुपयाचा भाव शेतकऱ्यांना कसा मिळेल, यासाठी शासन शेतकऱ्यांना मदत करत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबविणार नाही. आंदोलनाची भूमिका किसान सभा आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने घेतला आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Navale informed that the agitation for milk price will continue in state tomorrow