उपमुख्यमंत्री पवार धावले पिचडांच्या मदतीला

मधुकर आणि वैभव पिचड
मधुकर आणि वैभव पिचड

अकोले : अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे सत्ताधारी-विरोधकांत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या. मात्र आता अगस्ती वाचविण्यासाठी सत्ताधारी व विरोधक एकत्र आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. कारखान्याचे अध्यक्ष माजी मंत्री पिचड, उपाध्यक्ष सीताराम पाटील गायकर व आमदार डॉ. किरण लहामटे यांनी वेगवेगळ्या पत्रकार परिषदा घेऊन कारखाना वाचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Ajit Pawar's help to Pichad for Agastya factory)

अगस्ती कारखाना कार्यस्थळावर आयोजित पत्रकार परिषेदत गायकर म्हणाले, ‘‘संचालकांनी राजीनामे दिल्यावर शेतकऱ्यांबरोबर व्यापारी, कामगारांत उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. कारखाना टिकला पाहिजे, या दृष्टिकोनातून सुकाणू समन्वय समितीच्या बैठकीत डॉ. अजित नवले, सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी बी. जे. देशमुख, आ. डॉ. किरण लहामटे, ज्येष्ठ नेते दशरथ सावंत, भाकपचे नेते कॉ. कारभारी उगले यांनी कारखान्यास मदत करण्याचे धोरण स्वीकारले.’’

मधुकर आणि वैभव पिचड
राष्ट्रवादी-शिवसेनेचं ठरलं; शेंडगे महापौर, भोसले उपमहापौर

‘‘मुंबई येथे मंगळवारी (ता.२२) आपण आ. डॉ. किरण लहामटे, अशोकराव भांगरे, प्रकाश मालुंजकर, मीननाथ पांडे, अमित भांगरे यांच्यासह उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेतली. तसेच इथेनॉल प्रकल्प सुरू करण्याची माहिती दिली. पवार यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांना दूरध्वनीवरून ‘अगस्ती’ला मदत करण्याची सूचना केली.’’ त्यानंतर थोरात यांचीही शिष्टमंडळाने भेट घेतली. त्यांनीही सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिल्याचे गायकर यांनी सांगितले.

वक्तव्याचा विपर्यास ः पिचड
काही व्यावसायिकांना कारखाना बंद पाडून तो विकत घ्यायचा आहे, असे मी पत्रकार परिषदेत म्हणालो होतो. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. मी कुठल्याही राजकीय नेत्यांचे नाव घेतले नव्हते, असा खुलासा माजी मंत्री तथा कारखान्याचे अध्यक्ष मधुकर पिचड यांनी राजूर येथे पत्रकार परिषद घेऊन केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ‘अगस्ती’ संदर्भात नुकतीच मुंबई येथे भेट घेतली. त्यांनी कारखान्यास सर्वतोपरी मदत करण्याचे आश्‍वासन दिले आहे.
- आमदार डॉ. किरण लहामटे

(Ajit Pawar's help to Pichad for Agastya factory)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com