काय राव फटाके वाजवले; मिरचीचा धूर केला, मात्र ती काही हलेना

शांताराम काळे
Friday, 18 September 2020

अकोल्यामध्ये चार दिवस गायब झालेल्या बिबट्या मादीचा वावर पुन्हा वीज केंद्रात सुरू झाला आहे.

अकोले (नगर) : अकोल्यामध्ये एक नव्हे सलग तीन दिवस फटाक्यांचे बॉम्ब फोडले जात होते. मिरचीचा धूर केला, डफ वाजवले, स्पीकरची गाणे वाजवली, पण ती काही हलेना झालीय. व  पिंजऱ्यातील बकरीकडे डोळे करून पाहत ही नव्हती. मी इथून जाणार नाही, फटाके वाजवा नाही तर पिंजरे आणा असेच त्या बिबट्या मादीला वाटत असावे. कारण चार दिवस गायब झालेल्या बिबट्या मादीचा वावर पुन्हा वीज केंद्रात सुरू झाला आहे.

वनविभागाने युक्ती सांगितली फटाके वाजवून, मिरचीचा धूर करा म्हणजे ती जाईल. त्याप्रमाणे वीज केंद्रातील कर्मचारी तो प्रयोगही केला, मात्र ही मादी काय हलायचे नाव घेत नाही. आता तिच्या मागे दोन बछडे ही हिंडू फिरू लागले आहेत. जसी त्यांची रात्रपाळी असल्यासारखे सायंकाळी सात वाजले की हे मायलेकी गेटवर येऊन बसतात.

गेली दीड महिन्यापासून ही बिबट्या मादी या परिसरात ठान मांडून आहे. वनविभाग दुर्लक्ष्य करीत आहे, तर वीज कंपनी व कर्मचारी अस्वस्थ आहेत. या मायलेकरांचे करायचे काय? असा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा असून सध्या या भागात कुणी ये जासुद्धा करत नाहीत.

संपादन - सुस्मिता वडतिले 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Akola leopards have started roaming around the power station again