
अकोले : तालुक्यात जानेवारी २०२५ मध्ये अतितीव्र कमी वजनाची ८२, मध्यम तीव्र कमी वजनाची ४९२ कुपोषित आणि दुर्धर आजाराची २९, अशी ६०३ बालके आढळून आल्याची धक्कादायक बाब बालकल्याण प्रकल्प अधिकाऱ्यांनी पाठविलेल्या अहवालातून समोर आली आहे. या अहवालातून शासकीय आरोग्य यंत्रणा कुपोषणावर मात करण्यात सपशेल अपयशी ठरल्याने तालुक्यातील कुपोषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे.