esakal | अकोले : बीजमातेनी साकारला बियांचा गणपती बाप्पा
sakal

बोलून बातमी शोधा

ganpati

अकोले : बीजमातेनी साकारला बियांचा गणपती बाप्पा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोले : पारंपारिक बियाणे संवर्धनातून अकोले तालुक्याला देशात आणि विदेशात ओळख निर्माण करून देणाऱ्या बीजमाता पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांनी जीवापाड जपलेल्या बीज बँकेत विविध प्रकारच्या गावरान बियांचा वापर करून गणपती बाप्पा साकारले आहेत. मनोभावे त्यांची दररोज पूजा केली जाते.

बियाणे हेच आपले आयुष्य मानून शेतकरी वर्गासाठी दिवसरात्र कष्ट घेणाऱ्या बीजमाता म्हणून नावलौकिक असलेल्या राहीबाई व त्यांच्या परिवारातील सदस्य यांनी अतिशय कष्टाने आणि कल्पकतेने हे गणपती बाप्पा साकारले आहेत. बाप्पांची प्रतिकृती तयार करताना निसर्गातील विविध रंगछटा आणि आकार असलेल्या बियांचा अतिशय सुबकतेने त्यांनी वापर केलेला आहे. तृणधान्य गळीतधान्य तेलबिया भाजीपाल्याची विविध बियाणे यांचा त्यांनी वापर केलेला आहे.या कामात त्यांचे नातवंड, मुले आणि सुना यांनी त्यांना मनापासून मदत केलेली आहे. दररोज या बाप्पांचे मनोभावे संपुर्ण कुटुंबाकडून पूजा केली जाते.

हेही वाचा: उल्हासनगरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार; पाहा व्हिडिओ

विशेष म्हणजे या बाप्पांची जागासुद्धा बियाणे बँकेतच निवडण्यात आलेले आहे. देश आणि विदेशात मिळालेले पुरस्कार व सन्मान चिन्ह यांचा कल्पकतेने वापर करून सुंदर आरास बाप्पा भोवती तयार करण्यात आलेली आहे. राहीबाई यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून येत अनेक अडचणींवर मात करून पारंपारिक बियाणे जतन करून ठेवलेली आहेत. त्यांच्या या कार्याला बायफ या आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त संस्थेकडून तेवढीच तोलामोलाची साथ भेटल्याने हजारो शेतकऱ्यांपर्यंत गावरान बियांचा ठेवा पोहोचवता आल्याचे समाधान त्यांनी यावेळी व्यक्त केले. प्रत्येक गावात गावरान बियाण्यांची बँक तयार होऊ दे , शेतकरी राजाला समाधानाचे दिवस येऊदेत , पाऊस पाणी चांगला होऊ दे , हेच मागणे त्यांनी बाप्पाकडे मनोभावे केलेले आहे.

loading image
go to top