Ahilyanagar News : घोटी रस्त्यावरील अतिक्रमणांवर हातोडा; अकोलेत सार्वजनिक बांधकाम, नगरपंचायतीची संयुक्त कारवाई
रस्त्याच्या दुतर्फा दुकानांच्यासमोर असणारे बोर्ड, छत्र्या, पत्र्याच्या शेड, पडव्या, रस्त्यालगत असलेल्या टपऱ्या, लोखंडी बाकडे, हातगाड्या, जेसीबी व कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने हलविण्यात आल्या.
अकोले : अकोले शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्ता कोल्हार - घोटी राज्य मार्गालगतची अतिक्रमणे काढण्याची मोहीम राबविण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभाग अकोले व अकोले नगरपंचायतीने संयुक्तपणे ही कारवाई पोलिसांच्या बंदोबस्तात सुरू केली आहे.