
अकोले : मुलीने आई-वडिलांच्या मनाविरोधात प्रेमविवाह केला. त्याचा राग मनात धरून विवाहितेच्या नातेवाईकांनी जावयास दुचाकीवरून घरी नेऊन बेदम मारहाण करून झाडाला बांधून ठेवले. याप्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून तिच्या आई, वडिलांसह चुलत्याविरोधात अकोले पोलिसांनी गुन्हा दाखल केला.