

Akole
esakal
अकोले: अकोले नगरपंचायतीत भाजपचे स्पष्ट बहुमत असताना भाजपच्याच नगरसेवकांनी भाजपच्या नगराध्यक्षाविरोधात अविश्वास ठराव मंजूर केला. यामुळे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांना पदावरून पायउतार व्हावे लागले. दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव शुक्रवारी (ता.१७) विशेष सभेत १२ विरुद्ध शून्य मतांनी मंजूर झाला. भाजपचे चार आणि काँग्रेसचा एक नगरसेवक सभेला अनुपस्थित राहिले. यामुळे नगराध्यक्षपद रिक्त झाले.