esakal | 'यासाठी' पहाटे चार वाजल्यापासून पावसात रांगेत उभे राहत आहेत शेतकरी
sakal

बोलून बातमी शोधा

Akole taluka farmers have been rushing for fertilizer since 4 am

भंडारदरा, मुळा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकरी खतासाठी राजूर येथे पहाटे चार वाजेपासून रांगा लावत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

'यासाठी' पहाटे चार वाजल्यापासून पावसात रांगेत उभे राहत आहेत शेतकरी

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : तालुक्यातील भंडारदरा, मुळा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकरी खतासाठी राजूर येथे पहाटे चार वाजेपासून रांगा लावत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

शिरपूंजे, धमणवन, मवेसी, कुमशेत, साकिर वाडी, सवरकुठे अशी चाळीस गावातील लोक सुमारे पाचशे शेतकरी राजूर येथील खताच्या दुकानाबाहेर भर पावसात जमा झाले होते. केवळ 265शेतकऱ्यांना पोलिस व कृषी सहायक यांच्या उपस्थितीत टोकन देण्यात आले.

उर्वरित शेतकऱ्यांना घरचा रस्ता धरावा लागला. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या धामनवन येथील यशवंत भांगरे या शेतकऱ्याने आपण गेली. आठ दिवस खतासाठी चकरा मारत आहोत. भात रोपाला वेळेत खत मिळाले नाही, तर भाताचे रोप खराब होतील. पर्यायाने पीक येणार नाही. अगोदरच शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यात खत मिळत नसल्याने व मिळाले तर एखादी गोनी. त्यात किती क्षेत्राला खत देणार उर्वरित शेतीचे करायचे काय सरकारने तातडीने खते उपलब्ध करून द्यावीत. अन्यथा शेतकरी उध्वस्त होईल.

माय बाप सरकारने याचा विचार करून बांधावर नाहीच पण किमान ४० किलोमीटर वरून आलेल्या तेही पहाटे येऊन रांगेत उभ्या असलेल्या शेतकऱ्यांना खते देऊन न्याय द्यावा, असेही भांगरे म्हणाले. हनुमंता तुकाराम जाधव म्हणाले, पहाटे चार वाजता मवेशी येथून आलो आहे. रांगेत भर पावसात उभा असून केवळ 265कार्ड देण्यात आली. हजारो माणसे फिरून गेली आहेत. मी तीन दिवसापासून चकरा मारत असून मला फक्त एक गोन मिळाली. निम्मी लागवड झाली उर्वरित शेतीला खते कुठून आणि कसे आणायचे.

कुमशेत येथून आलेले शेतकरी पहाटे तीन वाजता येऊन रांगेत उभे राहिल्याचे सांगत होते. खताचा मोठा तुटवडा असून गरीब शेतकऱ्यांनी करायचे काय दाद कुणाकडे मागायची असा सवालही शेतकऱ्यांनी उपस्थित केला. शेतकरी टेम्पो, मोटरसायकलवर पावसात राजूर येथे आले.

गावात चार दुकाने असूनही खत मिळणे मुश्किल झाले आहे. सकाळी सात वाजता आमच्या प्रतिनिधीने आढावा घेतला असता कृषी विभागाचे कुणीही भेटले नाही. दुकानदार सुनील मुंढे यांनी 265शेतकऱ्यांना आम्ही टोकन दिले. त्याप्रमाणे रांगेत वाटप सुरु आहे.

खताचा तुटवडा असून जितका मालं आला तितका आम्ही देत आहोत. मात्र मागणी हजार शेतकरी यांच्ची व पुरवठा फक्त 265अशी स्थिती आमच्या प्रतिनिधी क्या समोर आली तर काही शेतकऱ्यांनी सांगितले.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image
go to top