अकोले : भंडारदरा-निळवंडेतून पाणी सोडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 हजार दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर होण्याची शक्यता आहे,

अकोले : भंडारदरा-निळवंडेतून पाणी सोडले

अकोले : कालवा सल्लागार समितीच्या नियोजनानुसार भंडारदरा- निळवंडे धरणांतून सिंचनासाठीचे प्रदीर्घ आवर्तन सोडण्यात आले. आज (मंगळवारी) सकाळी सहा वाजता निळवंडे धरणाच्या मोरीतून एक हजार ४०० क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. बुधवारी सायंकाळपर्यंत पाणी संगमनेरात पोचण्याची शक्यता आहे.

आज सकाळी पाणी सोडताना ११ हजार ३९ दशलक्ष घनफूट क्षमतेच्या भंडारदरा धरणात चार हजार ९७८ दशलक्ष घनफूट, तर आठ हजार ३२० दशलक्ष घनफूट क्षमतेच्या निळवंडे धरणात चार हजार ३१६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. चालू उन्हाळी आवर्तनात त्यातील तीन ते साडेतीन हजार दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर होण्याची शक्यता आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता अभिजित देशमुख यांनी दिली.

उन्हाळी हंगामात पाण्याअभावी पिके करपू नयेत, यासाठी आवर्तनाचे नियोजन करताना, उन्हाळी हंगामात लाभक्षेत्रासाठी तीन आवर्तने देण्याचे नियोजन केले जाते. प्रचंड उष्णतेच्या कालावधीत पाणी सुटल्याने व तब्बल महिनाभर पाणी वाहणार असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Web Title: Akole Water Released Bhandardara Nilwande

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :AhmednagarwaterSakalnagar
go to top