alcohol drunk by those who took the initiative for alcohol ban
alcohol drunk by those who took the initiative for alcohol banesakal

दारूबंदीसाठी पुढाकार घेतलेले पुढारीच नशेत तर्रर्र...

निघोज (जि. अहमदनगर) : जवळे (ता. पारनेर) येथे नुकत्याच घडलेल्या खूनप्रकरणामुळे व गावातील अवैध धंद्यांना लगाम बसावा म्हणून येथील ग्रामस्थांनी तातडीने दारूबंदी समितीची स्थापना केली. या समितीने लगेचच कामकाज चालू केले. रविवारी रात्री गावातील दारूविक्री होत असणाऱ्या ढाब्यांवर छापे टाकले. त्यावेळी त्यांना तिथे गावातील दारूबंदीसाठी पुढाकार घेतलेले प्रतिष्ठित दारू पिऊन झिंगताना आढळून आले. समितीच्या सदस्यांना पाहताच त्यांनी तोंड दडवत पळ काढला, तर काहींनी, पुन्हा नाही दिसणार, असे म्हणत दिलगिरी व्यक्त केली.

गावकारभारी दारूबंदीसाठी अनुकूल नाहीत

समितीच्या सदस्यांनी यावेळी या मद्यपींना समज देण्याची भूमिका घेतली. पुन्हा दिसले तर पोलिसांना बोलावून थेट गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा दिला. यावेळी पुरावे म्हणून सर्व घटनेचे मोबाईलद्वारे चित्रीकरण करण्यात आले आहे. प्रसंगी ते आम्ही ग्रामसभेत सादर करू, अशीही भूमिका समितीने घेतली आहे.

गेल्या महिनाभरापूर्वी गावातील याच मद्यधुंद पदाधिकाऱ्यांनी पोलिस निरीक्षकांना गावात दारूबंदी करण्यासाठी प्रत्यक्ष भेटून पत्र दिले होते. आज मात्र तेच पदाधिकारी गावातील याच ढाब्यांवर मद्य प्राशन करताना आढळले. जवळे गावात असणारे अधिकृत दारूचे दुकान पंचवीस वर्षांपूर्वी बंद केले होते. तेव्हापासून पुढे बरेच दिवस गावात दारूबंदी लागू होती. महिलांनी चार वर्षांपूर्वी गावात दारूबंदीसाठी मोठे आंदोलन केले होते. त्यामुळे दारूबंदीसाठी जवळे गाव नेहमी पुढाकार घेताना दिसते. मात्र, अलीकडच्या काळातील गावकारभारी मात्र यास फारसे अनुकूल नाहीत, हे कालच्या घटनेवरून अधोरेखित झाले.

alcohol drunk by those who took the initiative for alcohol ban
राज्यातील आदिवासी शाळांत ‘दिल्ली पॅटर्न’; प्राजक्त तनपुरे

दारूबंदी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी टाकलेल्या या धाडीत गावातील पुढारीच आढळून आल्यानंतर गावात अवैध धंद्यांना स्थानिक नेत्यांकडून पाठिंबा असल्याची चर्चा सुरू आहे. पोलिस प्रशासन मात्र येथील अवैध धंद्यांवर आता काय कारवाई करणार, याबाबत आता ग्रामस्थांमध्ये उत्सुकता आहे. जवळे दारूबंदी समितीचे अध्यक्ष रायचंद आढाव यांच्या अध्यक्षतेखाली ढाब्यांवर छापे मारण्यात आले.

alcohol drunk by those who took the initiative for alcohol ban
"रोहित पवारांचा विकास केवळ सोशल मीडियात"

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com