आघाडी सरकार दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांचे तोंड गोड करील, पालकमंत्री मुश्रीफ यांचे संकेत

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 22 October 2020

आगसखांड, शेकटे, मालेवाडी, भालगाव येथील पिकांच्या नुकसानीची पाहणी मुश्रीफ व अधिकारी आणि पदाधिका-यांनी केली. मुंगुसवाडे येथील विहरीत बुडुन मृत्युमुखी पावलेल्या मायलेकीच्या घरी पालकमंत्री मुश्रीफ यांनी भेट देवुन नारायण हिंगे यांचे सात्वन केले.

पाथर्डी : अतिवृष्टीमुळे शेतक-यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे .त्याची पाहणी करीत आहोत. पंचनामे करुन शेतक-यांचे तोंड गोड कसे करता येईल याची काळजी आम्ही घेवु. या भागातल्या उसतोडणी कामगारांना तोडणीचा दर सत्तावीस टक्यांनी वाढवुन देण्याचा आग्रह आम्ही शरद पवारांकडे धरला आहे. तो मान्य केला जाईल. शेतक-यांनी धीर सोडु नये, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

मालेवाडी येथील गोरक्ष दराडे यांच्या पाण्यात गेलेल्या कपाशीच्या पाहणी करताना पालकमंत्री मुश्रीफ यांनी शेतक-यांशी सवांद साधला. केदारेश्वरचे अध्यक्ष अँड. प्रताप ढाकणे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, महसुल विभागाचे नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे , जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परीषदेचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर,शिवशकंर राजळे, बाळासाहेब ताठे, गहीनीनाथ शिरसाट, बंडु बोरुडे, विष्णुपंत पवार, प्रांतअधिकारी देवदत्त केकाण, तहसिलदार शाम वाडकर, तालुकाकृषी अधिकारी प्रविण भोर, बन्सीभाऊ आठरे,वैभव दहीफळे, दिलीप पवळे, अनिल ढाकणे उपस्थीत होते.

आगसखांड, शेकटे, मालेवाडी, भालगाव येथील पिकांच्या नुकसानीची पाहणी मुश्रीफ व अधिकारी आणि पदाधिका-यांनी केली. मुंगुसवाडे येथील विहरीत बुडुन मृत्युमुखी पावलेल्या मायलेकीच्या घरी पालकमंत्री मुश्रीफ यांनी भेट देवुन नारायण हिंगे यांचे सात्वन केले.

सरकारी मदत देण्याचा प्रयत्न करतो असे हिमगे कुटुंबाला सांगितले. कोरडगाव येथे स्वप्नील देशमुख , अनिल बंड यांच्यासह शेतक-यांनी नुकसानीची भरपाई तातडीने मिळावी अशी मागणी पालकमंत्र्यांना भेटुन केली.पाथर्डीत पंचायत समितीसमोर गोकुळ दौंड, रविंद्र वायकर व पदाधिका-यांनी शेतक-यांना नुकसान भरपाई देण्याच्या मागणीचे निवेदन मुश्रीफ यांना दिले.

भालगाव येथे भाजापाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, माजी जिल्हा परीषद सदस्य सोमनाथ खेडकर, अशोक खरमाटे यांनी पालकमंत्र्याना निवेदन देवुन शेतक-यांना मदतीची मागणी केली. भालगाव ग्रामपंचायतीला विकासकामासाठी निधी देण्याची मागणी केली.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यातील महाआघाडीचे सरकार हे शेतकरी हिताचे व उसतोडणी कामगारांच्या कष्टाची कदर करणारे आहे. शेतक-यांनी धीर धरावा. दिवाळीपुर्वी शेतक-यांचे तोंड गोड कसे करता येईल, यासाठीचा निर्णय सरकार करणार आहे. तुम्ही काळजी करुन नका असा आधार शेतक-यांना बोलताना दिला. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The alliance government will help farmers before Diwali