अॉक्सीजन लेव्हल ३६, बेडही मिळेना; तरी आजीबाई झाल्या ठणठणीत

सर्वांनीच सोडली होती आशा
जाईबाई
जाईबाईई सकाळ

श्रीगोंदे : वय वर्ष 78, ऑक्सिजन लेव्हल फक्त 36..... मधुमेहासह रक्तदाबाचाही त्रास.. काही तासांची सोबती असल्याची भीती होती. त्यातच कुठल्याच रुग्णालयात ऑक्सीजन बेड उपलब्ध होत नव्हता. शेवटी चिंभळे येथील हंगेश्वर कोविड सेंटरला त्यांना आणले. त्यावेळी डाॅक्टरांनीही घरच्यांना खात्री देवू शकत नाही. मात्र, चमत्कार होवू शकतो असा विश्वास देत दाखल करुन घेतले आणि खरोखरच चमत्कार झाला. डाॅक्टरांचे प्रयत्न आणि त्या आजीचा आत्मविश्वास कामाला आला, आज त्या कोरोनाला हरवून ठणठणीत आहेत. (Although her oxygen level is low, her grandmother is in good health)

जाईबाई पंढरीनाथ शिंदे (वय 78 या बाबुर्डी ता. श्रीगोंदे) या आजीच्या बाबतीत घडलेले हे वास्तव आहे. चिंभळे येथील कोविड सेंटर चालविणारे डाॅ. सचिन जाधव, डाॅ. निखील गायकवाड व त्यांना मदत करणारे गणेश आडागळे व प्रियंका हरिहर यांचे प्रयत्न कामी आले. 2 मे रोजी जाईबाईंना खुप त्रास झाल्याने घरच्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची प्रयत्नांची पराकाष्ठा सुरु केली. मात्र, ऑक्सिजन बेड आसपासच्या रुग्णालयांनी उपलब्ध होत नव्हते.

शेवटी चिंभळे येथील कोविड सेंटरमध्ये प्रयत्न करण्याचा शिंदे कुटुंबांने निर्णय घेतला. जाईबाईंची परिस्थिती पाहून डाॅक्टरही हादरले होते. कारण त्यांना मधुमेह व रक्तदाबाचा त्रास असल्याचे सांगण्यात आले. त्यातच ऑक्सिजन लेव्हल होती फक्त 36. त्यामुळे त्या किती तासांच्या सोबती आहेत एवढाच प्रश्न राहिला होता. त्याही परिस्थितीत जाईबाई सगळ्यांना आधार देत कोरोना मला काही करीत नाही काळजी करू नका. उपचार सुरू करा, असा उलट धीर देत असल्याने डाॅ. जाधव, डाॅ. गायकवाड यांनी त्यांच्यावर लगेच उपचार सुरू केले.

आज जाईबाई ठणठणीत असून आसपास फिरतात, व्यवस्थित आहार घेतात व दुसऱ्या रुग्णांनाही आधार देत कोरोना काही करीत नाही, तुम्ही फक्त धीर सोडू नका, असे सांगत आहेत. आजही त्यांची ऑक्सिजन लेव्हल 75 च्या आसपास असली तरी त्या एकदम चांगल्या आहेत. दोन दिवसात त्यांना घरी सोडण्यात येणार आहे.

जाईबाईंना सेंटरला आणले त्यावेळी काही तासच जगतील असे वाटत होते. मात्र त्यांच्यात जगण्याची प्रचंड इच्छाशक्ती व कुटुंबाने आमच्यावर टाकलेला विश्वास यामुळे त्या कोरानावर मात करीत आहेत. आजही त्यांना वयोमानामुळे दम लागतोय मात्र त्या चांगल्या आहेत. आम्ही आमचे प्रयत्न केले शेवटी रुग्णाचे आत्मबल आणि देवाची इच्छा या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत.

-डाॅ. सचिन जाधव, चिंभळे.

(Although her oxygen level is low, her grandmother is in good health)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com