Ahmednagar News : त्यांच्या खिशात सामावलाय तब्बल ६७ वर्षांच्‍या सामान्य ज्ञानाचा खजिना!

अंबादास कांगुणे यांनी सन १९८० साली गावातील जन्म, मृत्यू, विवाह, वाढदिवस व गावात घडणाऱ्या चांगल्या, वाईट गोष्टींची वहीत नोंद सुरु केली.
Ambadas Kangune dream carried important things general knowledge notedbook
Ambadas Kangune dream carried important things general knowledge notedbook sakal

Maktapur News - पोलिस उपनिरीक्षक ते जिल्हाधिकाऱ्यांचे स्वप्न उराशी बाळगून गल्ली ते दिल्ली व जगातील महत्वाच्या गोष्टींचा अभ्यास करुन सामान्य ज्ञान प्राप्तीचा आटापिटा युवकवर्गाचा सुरु आहे.

मात्र डोळ्यासमोर कुठलेही उद्दीष्ट नसताना फक्त आवड म्हणून राजकीय, धार्मिक, ऐतिहासिकसह सर्व महत्वाच्या घटनांची नोंद करीत ६७ वर्षीय व्यक्ती ज्ञानाचा भांडार ठरत आहे. मक्तापूर (ता. नेवासे) येथील अंबादास विठ्ठल कांगुणे असे त्यांचे नाव असून ते जुन्या काळातील पदवीधर आहेत.

दोन हजार लोकसंख्या असलेल्या मक्तापूर गावात अंबादास कांगुणे यांनी सन १९८० साली गावातील जन्म, मृत्यू, विवाह, वाढदिवस व गावात घडणाऱ्या चांगल्या, वाईट गोष्टींची वहीत नोंद सुरु केली. पुढे तालुक्यात होणारे विकासकामे, राजकीय घडामोडी लिहिण्यास सुरुवात केली. त्यांच्या डायरीत राज्य व देशातील काही प्रमुख घडामोडींचे सुध्दा टीपण आहे. मोठे अपघात, सत्तांतर, मध्यवर्ती निवडणुका तसेच कीर्तनात महाराजांनी घेतलेला अभंग तोंडपाठ आहेत.

बीए शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या मागे न लागता त्यांनी शेती करण्याला अग्रक्रम दिला. सन १९७४ पासून त्यांना वर्तमानपत्र वाचण्याची आवड आहे. आजही ते तीन किलोमीटर जाऊन पाच, सहा वर्तमानपत्र वाचण्यासाठी घेऊन येतात. त्यांनी उत्तम शेती म्हणून मशागत, लागवड, खत व पाण्याचे प्रमाण तसेच कधी काय पीक घ्यावे याची नोंद ठेवलेली आहे.

Ambadas Kangune dream carried important things general knowledge notedbook
Ahmednagar News : ‘रक्षा’च्या खांद्यावर नगरची सुरक्षा; दोनशे पेक्षा अधिक गुन्ह्यांची केली उकल

पूर्वी त्यांनी पाणी वापर संस्थेवर उत्कृष्ट काम करुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलेले आहे. त्यांना वाल्मिक संस्थेचा नाशिक विभागातील पुरस्कार मिळालेला आहे. आपला छंद जोपासताना देश व राज्यातील अनेक प्रमुख घटना व प्रसंग त्यांचे तोंडपाठ झाले आहेत.

गप्पांच्या फडात ते नेहमीच बाजी मारतात. त्यांचे चिरंजीव अनिल कांगुणे सुध्दा उत्कृष्ट शेती करीत असून वडिलांच्या अनोख्या छंदाचा आम्हाला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. त्रेचाळीस वर्षांपासून विविध घटना लिहताना त्या घटनेचा आता अभ्यास झाला आहे. अनेक लहान, मोठ्या वह्या भरल्या आहे. यापुढे हे लिखाण सुधारीत पध्दतीने करणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com