अंबालिका कारखान्याची नगर जिल्ह्यात ऊस गाळपात आघाडी; साखर उताऱ्यात नागवडे अव्वल

Ambalika factory leads in sugarcane crushing in Nagar district
Ambalika factory leads in sugarcane crushing in Nagar district

अहमदनगर : जिल्ह्यातील 13 सहकारी व आठ खासगी साखर कारखान्यांनी आतापर्यंत 56 लाख 35 हजार 30 टन उसाचे गाळप केले आहे. गाळपात अंबालिका कारखाना, तर साखर उताऱ्यात नागवडे कारखाना जिल्ह्यात अव्वल आहे. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वापरण्यासाठी येथे क्लिक करा
जिल्ह्यात सहकारी व खासगी असे एकूण 23 कारखाने आहेत. त्यातील साईकृपा-दोन व तनपुरे सहकारी साखर कारखाना अजूनही बंद आहेत. जिल्ह्यातील 13 सहकारी कारखान्यांनी 37 लाख दोन हजार 365, तर आठ खासगी कारखान्यांनी 19 लाख 32 हजार 665 मेट्रीक टन, असे एकूण 56 लाख 35 हजार 30 टन उसाचे गाळप केले आहे. आजअखेर एकूण 49 लाख 240 क्विंटल साखर तयार झाली आहे.

त्यात अंबालिका कारखान्याने 6 लाख 83 हजार 475 टन गाळप केले असून, 6 लाख 26 हजार 900 क्‍विंटल साखर तयार करून जिल्ह्यात आघाडी कायम ठेवली आहे. त्या खालोखाल ज्ञानेश्‍वर कारखान्याने 5 लाख 7 हजार 270 टन उसाचे गाळप करून चार लाख 70 हजार 950 क्विंटल साखर तयार केली आहे. तिसऱ्या स्थानी भाऊसाहेब थोरात कारखाना असून, त्यांनी 4 लाख 84 हजार 150 टन उसाचे गाळप करून, चार लाख 24 हजार 260 क्विंटल साखर तयार केली आहे. 

गाळपात "अंबालिका'ची आघाडी 
अंबालिका कारखान्याने ऊसगाळपात आघाडी घेतली असली, तरी साखर उताऱ्यात नागवडे कारखाना आघाडीवर आहे. नागवडे कारखान्याचा साखर उतारा 10.11 आहे. त्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर साईकृपा-एक असून, त्यांचा साखर उतारा 9.79 आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com