अहमदनगरमध्ये आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत राडा, पोलीस 'अॅक्शन मोड'मध्ये

समाजकंटकांकडून दगडफेक, भिंगारमध्ये वादंग, संगमनेरात हुल्लडबाजी
राडा
राडाSakal

अहमदनगर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक झाली. गुरूवारी रात्री ११ वाजाता तख्ती दरवाजा व तेलीखुंट परिसरात ही घटना घडली. भिंगारमधील मिरवणुकीत दोन गटात हाणामाऱ्या झाल्या. संगमनेर शहरातील मेनरोडवर आलेल्या मिरवणुकीत जमाव घुसला. पोलिसांमुळे तणाव निवळला. या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.

तख्ती दरवाजा व

तेलिखुंट परिसरात जातीयवादी घोषणाबाजी व दगडफेकीची घटना घडली. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत.

आरपीआयच्या आठवले गटाची मिरवणूक रात्री अकरा वाजता तेलिखुंट परिसरात आली असताना मिरवणुकीवर दगडफेक झाली. पोलिस अधिकारी व कर्मचारीही यात जखमी झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून शबाब शहानवाज शेख (वय ३४, रा. बाबा बंगाली), फरहान फैरोज खान (वय १९, रा. मुकुंदनगर), मुजाहीद हुसैन शेख (वय २१, रा. सर्जेपुरा), इरफान शकील शेख (वय २९, रा. तेलिखुंट), सोयब नादीर शेख (वय ३३, रा. फकीरगल्ल्ली, सर्जेपुरा), आरिफ आसिफ सय्यद (वय २१, रा. मुकुंदनगर), शाकीब अन्सार सय्यद (वय २१, रा. आलमगीर मैदान, मुकुंदनगर), दानिश शकील सय्यद (वय २२, रा. दरबार चौक, मुकुंदनगर), तहा अनवर खान (वय २१, पाचलींब गल्ली), अदनान हुसेन शेख (वय १८, रा. कोठला), समी जावेद पठाण (वय १९, रा. मुकुंदनगर) व दोन अल्पवयीन अशा १३ जणांना ताब्यात घेतले. तसेच इतर ५० ते ६० जण पळून गेले.

पोलिस जखमी

पोलिस नाईक अविनाश वाकचौरे, पोलिस हेड कॉन्स्टेबल सुधीर क्षीरसागर, संदीप घोडके, प्रदीप सानप, पोलिस कॉन्स्टेबल चेतन मोहिते हे या घटनेत जखमी झाले. या घटनेअगोदर साडेदहा वाजण्याच्या सुमारास तख्ती दरवाजा येथे दोन गटांत जातीयवादी घोषणाबाजी झाली. या प्रकरणी उमेश दगडू शेरकर यांनी कोतवाली पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी लाठीमार करीत जमाव पांगवला. ध्वनी प्रदूषणप्रकरणी सहा मंडळांचे अध्यक्ष व डीजे मालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com