आंबेडकरांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले - आमदार काळे

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 6 December 2020

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवण व त्यांच्या विचारांचे सर्वांनी अनुकरण करावे, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले. 

कोपरगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेले आदर्श व त्यांनी दिलेला शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हा संदेश जीवनाला दिशा देण्याचे काम करीत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवण व त्यांच्या विचारांचे सर्वांनी अनुकरण करावे, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आमदार आशुतोष काळे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक पद्माकांत कुदळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगुले, नगरसेवक विरेन बोरावके, मंदार पहाडे, सुनील शिलेदार, संतोष चवंडके, डॉ. अजय गर्जे, धरमकुमार बागरेचा, शहराध्यक्ष नवाज कुरेशी, दिनार कुदळे, कृष्णा आढाव, डॉ. तुषार गलांडे, जावेद शेख, सुनील मोकळ, दादासाहेब साबळे आदी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ambedkar worked to give direction to the society