कर्जतमध्ये अंबर दिव्याची गाडी बाळगणारा अटकेत

नीलेश दिवटे
Saturday, 31 October 2020

या प्रकरणी सव्वापाच लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी दत्तू सकट (रा टाकळी खंडेश्वरी ता कर्जत) यास अटक केली आहे.

कर्जत : तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी येथील एका आरोपीला घातक शस्त्र व अंबर दिव्याची गाडी उप विभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी जप्त केली आहे. या प्रकरणी सव्वापाच लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी दत्तू सकट (रा टाकळी खंडेश्वरी ता कर्जत) यास अटक केली आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी येथे हे एका इसमाने स्वतःच्या घरात दोन लोखंडी तलवारी व गाडीत अंबर दिवा लपवून ठेवला असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी जाधव यांना मिळाली.

या माहितीवरून त्यांनी पथकाने जात आरोपी दत्तू मुरलीधर सकट रा (सपकाळ वस्ती, टाकळी खंडेश्वरी ता कर्जत) याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून दोन तलवारी व एक चार चाकी गाडी (एम एच १६/ आर ४८३३) जप्त केली आहे. त्याच्यावर शस्त्र बाळगणे, अंबर दिव्याचा गैरवापर यासह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आज जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक मनोजकुमार पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलीस गौतम फुंडे, केशव व्हरकटे, हृदय घोडके, सागर जंगम, आदित्य बेलेकर, गोवर्धन कदम, वैभव सुपेकर, दादाराम म्हस्के, रत्नमाला हराळे, मच्छिंद्र जाधव आणि संतोष साबळे या पथकाने सदर कामगिरी बजावली आहे. अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amber Divya car driver arrested in Karjat