esakal | हेलिकॉप्टरने आली लग्नाची वरात! वरासोबत डॉ. अमोल कोल्हें उतरले...
sakal

बोलून बातमी शोधा

wedding

हेलिकॉप्टरने आली लग्नाची वरात! वरासोबत डॉ. अमोल कोल्हेही

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

सोनई (जि. नगर) : ‘राजा की आयी है बारात...’ या गाण्याप्रमाणे वधूच्या घरासमोरील अंगणात वऱ्हाड येण्यापूर्वीच हवेली (जि. पुणे) येथील वराचे हेलिकॉप्टर आले. त्यातून उतरलेल्या वराबरोबर होते खासदार डॉ. अमोल कोल्हे. (Amol-kolhe-helicopter-arrived-for-wedding-marathi-news)

१० ते १५ राजकीय व्यक्ती उपस्थित

वडाळा बहिरोबा (ता. नेवासे) येथील प्रगतिशील शेतकरी विलास मोटे यांची कन्या प्रणोती व हवेली (जि. पुणे) येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांचे चिरंजीव कार्तिक यांचा साखरपुड्याचा कार्यक्रम मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत व कोरोना नियमांचे पालन करत शुक्रवारी (ता. २) साध्या पद्धतीने पार पडला. कोरोना निर्बंधांमुळे कुटुंबातील सदस्यांसह १० ते १५ राजकीय व्यक्ती उपस्थित होत्या. हेलिकॉप्टरने आगमन वगळता संपूर्ण कार्यक्रम साध्या पद्धतीने पार पडला, असे मुळा कारखान्याचे उपाध्यक्ष भाऊसाहेब मोटे यांनी सांगितले.

हेही वाचा: पाथर्डीतील गणेशमूर्तींची लंडनला वारी! मागणी वाढल्याने दरही चांगला

‘संभाजी राजें’ना पाहण्यासाठी गर्दी

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत छत्रपती संभाजी राजांची भूमिका साकारल्याने खासदार डॉ. अमोल कोल्हे घराघरांत पोचले आहेत. त्यांना पाहण्यासाठी हेलिपॅडजवळ चाहत्यांची गर्दी झाली होती.

हेही वाचा: कोरोना महामारीचे सोंग घेतलेल्या शिक्षण विभागाला अखेर जाग

loading image
go to top