
कोपरगाव : आषाढी एकादशीचे औचित्य साधून कलाशिक्षक अमोल बाळासाहेब निर्मळ यांनी कृष्ण तुळशी पानावर विठ्ठलाचे हुबेहूब देखणे रेखाचित्र रेखाटून विठ्ठला प्रतीचा भक्तिभाव व्यक्त केला आहे. आषाढी एकादशीची लगबग सर्वत्र सुरू असून, अनेक दिंड्या पंढरपूरकडे प्रस्थान ठेवत आहेत. त्यातच अनेक कलाकार आपल्या पद्धतीने कलेच्या माध्यमातून विठ्ठला प्रति भक्तिभाव व्यक्त करत आहे.