
पिचड म्हणाले, की कोरोनामुळे सर्व व्यवसायांवर परिणाम झाला. दूधउत्पादकांनाही त्याचा मोठा फटका बसला. पूर्वी 32 ते 33 रुपये प्रतिलिटर असलेला दर अचानक 20 ते 25 रुपयांपर्यंत खाली आला.
अकोले : अमृतसागर दूध संघाकडून दूधउत्पादकांना प्रतिलिटर एक रुपया दरफरक (रिबेट) देण्यात आला. सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट दोन हजार रुपये पगारवाढ व 15 टक्के बोनस देण्याचाही निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.
त्यात दूध दरफरकापोटी 2 कोटी 44 लाख, पेमेंटचे 2 कोटी 50 लाख, बोनससाठी 35 लाख, व्यापारी देणे 10 लाख, असे साडेपाच कोटी रुपये बॅंकेत वर्ग करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती संघाचे अध्यक्ष वैभव पिचड यांनी दिली.
अमृतसागर दूध संघाच्या संचालक मंडळाची बैठक पिचड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, गोरक्ष मालुंजकर, विठ्ठल डुंबरे, विठ्ठल चासकर, शरद चौधरी, भाऊ पाटील नवले, सोपान मांडे, रामदास आंबरे, सुभाष बेनके, प्रवीण धुमाळ आदी उपस्थित होते.
पिचड म्हणाले, की कोरोनामुळे सर्व व्यवसायांवर परिणाम झाला. दूधउत्पादकांनाही त्याचा मोठा फटका बसला. पूर्वी 32 ते 33 रुपये प्रतिलिटर असलेला दर अचानक 20 ते 25 रुपयांपर्यंत खाली आला. संघ 3 ते 4 रुपये लिटर तोटा सहन करून उत्पादकांना 25 रुपये दर देत होता. दुसरीकडे, खासगी संघ 20-21 रुपये प्रतिलिटरप्रमाणे दुधाची खरेदी करीत होते.