Anganwadi Transformed Through Public Donations : ग्रामस्थांच्या लोक वर्गणीतून अंगणवाडीचे रूपडे पालटले आहे. शाळेच्या आत तसेच बाहेरच्या संरक्षक भिंतींवर वेगवेगळी आकर्षक चित्रे रेखाटून त्यांना बोलते करण्यात आले आहे. त्यातून गावच्या सौंदर्यात भर पडली आहे.
Wall paintings in Anganwadis helping raise social awareness and educate children, fostering community involvement and positive change.Sakal
देवदैठण : प्रत्येक विद्यार्थ्यांचा शाळेचा श्रीगणेशा हा अंगणवाडीमधून होत असतो. लहान वयात शाळेची गोडी लागावी व इथूनच संस्कारक्षम पिढी घडावी यासाठी देवदैठण (ता. श्रीगोंदे) ग्रामस्थांच्या संकल्पनेतून बोलक्या भिंती तयार झाल्या.