
अहिल्यानगर : कर्जत तालुक्यातील येसवडी व राशीन शिवारातील दोन कत्तलखान्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापे टाकून सहा लाख ४५ हजार रुपयांच्या २१ गोवंशीय जनावरांची सुटका केली. एका आरोपीला ताब्यात घेतले असून चौघांविरुध्द कर्जत पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.