राहुरीच्या नगराध्यक्षपदी अनिता पोपळघट बिनविरोध

विलास कुलकर्णी
Friday, 25 September 2020

नगराध्यक्षपदासाठी अनिता पोपळघट व अनिल कासार यांनी उमेदवारीअर्ज दाखल केले होते. काल (गुरुवारी) अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कासार यांनी माघार घेतली. त्यामुळे पोपळघट यांच्या नावाची औपचारिकता बाकी होती.

राहुरी : नगराध्यक्षपदी अखेर अनिता दशरथ पोपळघट यांची बिनविरोध निवड झाल्याचे प्रांताधिकारी अनिल पवार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित बैठकीत जाहीर केले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी पालिका कार्यालयासमोर फटाक्‍यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. 

पालिकेच्या सभागृहात आज दुपारी नगराध्यक्ष निवडीसाठी नगरसेवकांची बैठक झाली. निवडणूक निर्णय अधिकारी, तथा प्रांताधिकारी अनिल पवार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत भाग घेतला.

सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी श्रीनिवास कुरे, उपनगराध्यक्ष राधा साळवे, नगरसेवक राखी तनपुरे, संगीता आहेर, नंदकुमार तनपुरे, सोन्याबापू जगधने, सुमती सातभाई, अनिल कासार, प्रकाश भुजाडी, दिलीप चौधरी, मुक्ताबाई करपे, सूर्यकांत भुजाडी, सोनाली बर्डे, ज्योती तनपुरे, नंदा उंडे, अनिता पोपळघट आदी उपस्थित होते. 

नगराध्यक्षपदासाठी अनिता पोपळघट व अनिल कासार यांनी उमेदवारीअर्ज दाखल केले होते. काल (गुरुवारी) अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कासार यांनी माघार घेतली. त्यामुळे पोपळघट यांच्या नावाची औपचारिकता बाकी होती.

एकच अर्ज असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी पवार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नगरसेवकांशी संवाद साधत पोपळघट यांच्या निवडीची घोषणा केली. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anita Popalghat unopposed as the mayor of Rahuri