
पारनेर : ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांना मिळालेल्या विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराच्या रकमेतून पुढील काळात दरवर्षी सामाजिक काम करणाऱ्या व कर्तृत्ववान व्यक्तींना हजारे यांच्या वाढदिवसानिमित्ताने अण्णा हजारे सामाजिक गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. हजारे यांना मिळालेल्या पुरस्काराच्या रकमेतून हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.