
पारनेर : सरकार कोणाचेही असो, नाक दाबले तर तोंड उघडले पाहिजे, असे मजबूत संघटन निर्माण झाले पाहिजे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी समाज व राष्ट्रहित डोळ्यांसमोर ठेवून काम केले पाहिजे. जन आंदोलनामुळे देशाला आणि राज्याला माहितीचा अधिकार, ग्रामसभेला जादा अधिकार, दप्तर दिरंगाई, बदल्यांचा कायदा, ग्रामरक्षक दल, जन लोकपाल कायदा, यांसारखे दहा कायदे मिळाले, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.