शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अण्णा हजारे यांचे उद्या एक दिवसाचे उपोषण

एकनाथ भालेकर
Monday, 7 December 2020

दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटत आहेत.

राळेगणसिद्धी (अहमदनगर) : दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटत आहेत. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरोधात जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उद्या राळेगणसिद्धीतील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत.

उद्या सकाळी ठीक 9.30 वाजता जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे उपोषण स्थळी पोहचतील. त्यानंतर शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत.

सविस्तर बातमी थोड्याचवेळात...

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anna Hazare will go on a one day fast tomorrow to support the farmers movement