शेतकऱ्यांसाठी अण्णांचे करेंगे या मरेंगे, शेतकरी संघटनाही पाठिशी

एकनाथ भालेकर
Saturday, 23 January 2021

हजारे म्हणाले, ""शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत केंद्र सरकार उदासीन आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनात 50 हून अधिक शेतकऱ्यांचे निधन झाले, तरी केंद्र सरकार विचार करीत नाही.

राळेगण सिद्धी : केंद्र सरकारच्या लेखी आश्वासनांवर विश्वास राहिला नसल्याने, शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शरीरात प्राण असेपर्यंत लढा देण्याचा निर्धार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केला. 

शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना, राष्ट्रीय किसान संघटना व प्रहार किसान संघटना यांच्या संयुक्त राष्ट्रीय किसान परिषदेत हजारे बोलत होते.

आंदोलनात निधन झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल पवार, प्रदेश कार्याध्यक्ष जी. डी. इमानदार, माजी न्यायाधीश एल. एल. सावंत, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. महेंद्र काबरा, मध्य प्रदेशचे अध्यक्ष सफल चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. गजेंद्र पाटील, प्रदेश सचिव मालती पाटील आदी उपस्थित होते. 

हजारे म्हणाले, ""शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत केंद्र सरकार उदासीन आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनात 50 हून अधिक शेतकऱ्यांचे निधन झाले, तरी केंद्र सरकार विचार करीत नाही. त्यामुळे माझ्या शेतकरीराजासाठी पुन्हा 30 जानेवारीला उपोषण करणार आहे.'' 

विठ्ठल पवार म्हणाले, ""शेतमालाच्या हमी भावासाठी हजारे यांच्या नेतृत्वाखाली देशभर "करेंगे या मरेंगे' अशी भूमिका घेत आंदोलन केले जाईल.'' 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anna's fast for farmers at Ralegan Siddhi