
जामखेड : आमदार रोहित पवार यांनी निवडून आल्यापासून कामांचा धडाका लावला आहे. एसआरपीएफचे केंद्र, नदी सुशोभिकरण, तलाव खोलीकरण ही ठळक कामे आहेत.
शासनाने जामखेड ग्रामीण रुग्णालयाचे रुपांतर उपजिल्हा रुग्णालयात केले आहे. या पुढील काळात निरनिराळ्या गंभीर आजारांवर उपचार व शस्रक्रिया येथेच होणार आहेत. नेहमीच उपचारासाठी रुग्णांची होणारी हेळसांड थांबणार आहे. वेळेअभावी अनेकांना प्राणाशी मुकावे लागत होते, आता तसे होणार नाही.
जामखेडकर केवळ ट्रॉमा सेंटरची मागणी करीत होते. मात्र, अंतराच्या कारणामुळे ते मंजूर होत नव्हते. कारण आष्टीला ते सेंटर आहे. रोहित पवार यांनी ट्रॉमा केअर सेंटरच्या पुढे जाऊन थेट उपजिल्हा रुग्णालयच मंजूर करून आणले.
शिर्डी-हैदराबाद महामार्गावरील हा तालुका आहे. येथूनच मराठवाड्याला पश्चिम महाराष्ट्र जोडला जातो. या रस्त्यावर कायम वर्दळ असल्याने रूग्णाच्या वारंवार अपघात होतात. थेट नगरला न्यावे लागत असल्याने लोकांच्या ह्रदयाचे ठोके वाढायचे. कारण दोन-अडीच तासांचा प्रवास जीवावर बेतायचा.
आमदार रोहित पवार यांनी या सगळ्या अडचणी ओळखून ग्रामीण रुग्णालयाचे रुपांतर उपजिल्हा रुग्णालयात करवून आणले. गेली वर्षभर त्यांचा पाठपुरावा सुरू होता. परंतु जोपर्यंत मंजूर होत नाही, तोपर्यंत त्यांनी काही वाच्यता केली नाही. अखेर बुधवारी (३१ मार्च) प्रस्तावास मंजूरी मिळाल्याचा आदेश सोशल मीडियावर व्हायरल केला.
जामखेडला ग्रामीण रुग्णालयात असणाऱ्या तीस बेडवरून उपजिल्हा रुग्णालयाचे शंभर बेड असे रुपांतर होणार आहे. सुसज्ज इमारत, मनुष्यबळासह दिमाखदार भव्य इमारत उभी राहणार आहे. या करिता ग्रामीण रुग्णालयाचीच जागा वापरात आणली जाणार आहे.. तसेच दोन मजली भव्य आणि प्रशस्त इमारत उभी राहणार आहे.
जामखेड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय झाला आहे. आमदार रोहित पवारांकडून खूप मोठी भेट मिळाली आहे. आमदार पवारांसाठी शासनाने खास बाब म्हणून हा आदेश काढला आहे.
उपजिल्हा रुग्णालयाकरिता आठ अधिक एक असे नऊ निरनिराळ्या फॅकल्टीचे स्पेशालिस्ट मेडिकल अॉफिसर येतात. त्यामुळे निरनिराळे उपचार, शस्रक्रिया होतात. ही जामखेड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी पर्वणी ठरेल, हे मात्र निश्चित!
- डॉ. संजय वाघ, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय जामखेड.
संपादन - अशोक निंबाळकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.