
संगमनेर : तालुक्यात अपर तहसील कार्यालयावरून चांगलेच वातावरण तापले आहे. आज पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील समर्थकांनी जोर्वे येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. यावेळी मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जोर्वे गावातच अपर तहसील कार्यालयाची मागणी, यावेळी विखे समर्थकांनी केली. त्यास उपस्थित माजी मंत्री बाळासाहेब थोरात समर्थकांनी विरोध केला. ग्रामसभा संपल्यानंतर तेथेच थोरात समर्थकांनी बैठक घेत अपर तहसील कार्यालयास कडाडून विरोध केला.