esakal | ऊसाची काळजी घ्या; पावसामुळे रोगाचा प्रादुर्भाव
sakal

बोलून बातमी शोधा

Appeal from the Department of Agriculture to take care of the sugarcane crop

ऊसवर करपा सदृश्य तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. पांढऱ्या माशीच्या किडीमुळे प्रादुर्भाव झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभाने वर्तविला आहे.

ऊसाची काळजी घ्या; पावसामुळे रोगाचा प्रादुर्भाव

sakal_logo
By
गौरव साळुंके

श्रीरामपूर (अहमदनगर) : तालुक्यातील ऊसवर करपा सदृश्य तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. पांढऱ्या माशीच्या किडीमुळे प्रादुर्भाव झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभाने वर्तविला आहे. मागील महिन्यात तालुक्यात सलग झालेल्या पावसामुळे ऊसावरील किडचे प्रमाण वाढले. 

ऊसाच्या पानावर पडलेली कीड पानातील रस शोषन करीत असल्याने ऊस उत्पादकांची चिंता वाढली आहे. यंदा ऊस उत्पादनात काही अंशी घट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पावसाळ्यात ऊस पिकात सतत पाणी साचल्याने चर काढुन पिकातील साचलेले पाणी शेताबाहेर काढण्याचे आवाहन विभागीय कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे. 

तालुक्यातील अनेक शेतकर्त्यांचे ऊसाचे प्लाॅट यंदा रोगामुळे खराब झाले आहे. ऊस पिकात पावसाचे पाणी साचलेल्या पाणथळ जमीनीतील ऊसाचे पिक रोगामुळे धोक्यात आले आहे. रासायनिक खतांचा अति वापराने तांबेरा रोग पडतो. रोग नियंत्रणासाठी पावसाची उघडीप आणि पुरेसा सुर्यप्रकाश मिळणे गरजे असते. परंतू पावसाची उघड नसल्याने पुरेसा सुर्यप्रकाश मिळत नाही. त्यामुळे शेतकरी डायथेन 45 औषधाची फवारणी करुन ऊस पिक वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. करपा सदृश्य तांबेरा रोगामुळे ऊसाला पाहिजे अन्नद्रव्य मिळत नाही. त्यामुळे ऊस उत्पादनात काही प्रमाणात घट येण्याचा अंदाज शेतकर्यांनी व्यक्त केला आहे.

सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाईची मागणी शेतकर्यांनी केली आहे. गोदावरी, प्रवरानदी पट्यातील शिवारासह पाणथळ जमीनीतील ऊस पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव वाढने ऊस पीक रोगांनी ग्रासले आहे. तालुक्यात ऊसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. त्यासाठी कालव्याचा आवर्तनाचा मोठा फायदा होतो. परंतू यंदा समाधानकारक पावसाने ऊस पिकाला पाणी देण्याची फारसी गरज पडली नाही. सलग सुरु असलेल्या पावसामुळे ऊसावरील रोगराई वाढली आहे.

ऊसावर तांबेरा रोग बुरशीमुळे पडतो. प्रारंभी उसाच्या पानावर तांबडे ठिपके पडतात. त्यानंतर ठिपक्यांचा आकार वाढल्याने ऊसाची पाने तांबूस पडतात. पानेच खराब झाल्याने ऊसतील सुर्यप्रकाश शोषण्याची प्रक्रिया थांबते. याचा फटका ऊस वाढीला बसल्याने उत्पादन घटते. त्यामुळे ऊस पिकावरील रोग नियंत्रणासाठी येथील अशोक सहकारी साखर कारखान्याने जनजागृती मोहीम राबविली आहे. शेतकर्यांना आपल्या ऊस पिकांवरील रोग ओळखण्यासाठी माहिती पत्रक काढले आहे. तसेच रोगाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी औषध फवारणीसाठी माफक दरात उपलब्ध करुन दिले आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर