
वाढदिवस म्हणले की तरूण कार्यकर्ते केक, डीजे, विविध शुभेच्छा फलक यावर पैसे खर्च करतात. त्याचा समाजाला काहीच उपयोग होत नाही.
टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : वाढदिवस म्हणले की तरूण कार्यकर्ते केक, डीजे, विविध शुभेच्छा फलक यावर पैसे खर्च करतात. त्याचा समाजाला काहीच उपयोग होत नाही. यापेक्षा वाढदिवसानिमित्त शालेय साहीत्य, रक्तदान यासंह अन्य बाबींना तरूणांनी प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी केले आहे.
वनकुटे (ता. पारनेर) येथे जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत ई रिक्षाचे वितरण व जेष्ठ नागरिकांना काठ्यांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी किसन धुमाळ, मोहन रोकडे, दीपक गुंजाळ, ऋषिकेश गागरे, डॉ. नितीन रांधवन, भानुदास गागरे, दत्तात्रय काळनर उपस्थित होते.
झावरे म्हणाले, आपल्या वाढदिवशी आपण समाजाच्या किती उपयोगी पडलो. हे समाज नेहमी पाहत असतो. आपण ज्या समाजाता राहतो त्या समाजाचे आपण काही देणे लागतो. आपल्यासाठी समाजाने काय केले यापेक्षा आपण समाजासाठी किंबहूना या देशासाठी काय करु शकतो. हि भावना महत्वाची आहे. ज्यास अन्न हवे त्यास अन्न द्या,एखाद्या शिक्षण घेण्या-या विद्यार्थ्यास शालेय साहीत्याची अडचण ती पुर्ण करा समाजासाठी वाढदिवस करा स्वतःसाठी नाही असे आवाहन झावरे यांनी केले.
संपादन : अशोक मुरुमकर