म्हणून विद्यमान सरपंचाचीच ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून नेमणुक करा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 18 July 2020

भाजपचे नगरचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवुन महाराष्ट्रात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणुन विद्यमान सरपंच यांचीच नेमणुक करावी व काही राजकीय पक्षांकडुन होणारा घोडेबाजार थांबवावा, अशी मागणी केली आहे.

अहमदनगर : भाजपचे नगरचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवुन महाराष्ट्रात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणुन विद्यमान सरपंच यांचीच नेमणुक करावी व काही राजकीय पक्षांकडुन होणारा घोडेबाजार थांबवावा, अशी मागणी केली आहे.

कोरोना व्हायरसच्या संकटात प्रत्यक गावाने विद्यमान सरपंच यांच्याच नेतृत्वाखाली यशस्वी लढा दिला आहे. त्याचबरोबर आनेक विकास कामे सुरु आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडीतील काही पक्षाकडुन घोडेबाजारच्या आधारावर प्रशासक यांच्या नेमणुका झाल्या तर विकास कामाना खिळ बसेल व गावाची राजकीय सामाजिक घडी विस्कटेल. गावातील वातावरण कलुषित होईल, त्यामुळे विद्यमान सरपंच यांनाच प्रशासक म्हणुन नेमले पाहिजे. राजकिय अस्थिरता निर्माण झाल्यास पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना काळजीवाहु म्हणुन काम पाहण्यास सांगीतले जाते. त्याप्रमाणे ग्रामपंचायतबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यसमिती सदस्य व माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.
संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appoint the existing Sarpanch as the administrator of the Grampanchayat