esakal | इंदुरीकर महाराजांच्या खटल्यासाठी नवीन सरकारी वकिलांची नियुक्ती; पुढील सुनावणी 2 डिसेंबरला
sakal

बोलून बातमी शोधा

Appointment of new government advocate for the case of Indurikar Maharaj

निवृती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्याविरोधात आरोग्य विभागाने पीसीपीएनडीटी (प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायदा) कायद्याचा भंग केल्याचा खटला दाखल केला आहे.

इंदुरीकर महाराजांच्या खटल्यासाठी नवीन सरकारी वकिलांची नियुक्ती; पुढील सुनावणी 2 डिसेंबरला

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : अपत्य जन्माबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरुन कीर्तनकार निवृती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्याविरोधात आरोग्य विभागाने पीसीपीएनडीटी (प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायदा) कायद्याचा भंग केल्याचा खटला दाखल केला आहे. या खटल्याचे कामकाज जिल्हा सत्र न्यायालयात सुरु आहे. या खटल्याची आज असलेली सुनावणी पुढे ढकलण्यात आली. पुढील सुनावणी येत्या 2 डिसेंबरला होणार आहे.

इंदुरीकर महाराजांचे वकील ॲड. के. डी. धुमाळ यांच्याकडे सरकारी वकील ॲड. बी. जी. कोल्हे यांच्या भावाचे न्यायप्रविष्ठ प्रकरण आहे. या संबंधाचा इंदुरीकरांच्या खटल्यावर परिणाम होऊ शकतो असा आरोप झाल्याने, ॲड. कोल्हे यांनी या प्रकरणी व्यक्तीगत चिखलफेक होण्यापेक्षा मला या खटल्याच्या कामात स्वारस्य नसल्याचे सरकारी वकिल कार्यालयास कळवून आपले वकील पत्र मागे घेतले आहे.

त्यामुळे आता या खटल्यासाठी सरकारी पक्षाने अॅड. अरविंद राठोड यांची नियुक्ती केल्याची माहिती न्यायालय अधीक्षकांनी दिली. या प्रकरणात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे अँड. रंजना गवांदे बाजू मांडीत आहेत. सर्वांना लेखी युक्तिवाद सादर करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर