esakal | धनुर्धारी शरण्याची एशिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद 
sakal

बोलून बातमी शोधा

sharanya

अहमदनगर जिल्हा धनुर्धारी संघटनेची रिकर्व्ह धनुर्विद्या खेळाडू शरण्या मिनिल सोनवणे हीची एशिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद झाली आहे. ती सर्वांत लहान वयाची रिकर्व्ह राउण्ड धनुर्विद्या खेळाडू ठरली आहे.

धनुर्धारी शरण्याची एशिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर : अहमदनगर जिल्हा धनुर्धारी संघटनेची रिकर्व्ह धनुर्विद्या खेळाडू शरण्या मिनिल सोनवणे हीची एशिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद झाली आहे. ती सर्वांत लहान वयाची रिकर्व्ह राउण्ड धनुर्विद्या खेळाडू ठरली आहे. 

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या नऊ वर्षांखालील जिल्हास्तरीय धनुर्विद्या अजिंक्‍यपद स्पर्धेत तिने 360 पैकी 342 स्कोअर करुन सुवर्ण पदक पटकावले होते. त्यावेळी तिचे वय 7 वर्ष 3 महिने होते. तिच्या याच कामगिरीची नोंद सर्वप्रथम इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये करण्यात आली. आता एशिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये करण्यात आल्याचे प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह पोस्टाद्वारे प्राप्त झाले आहे. 

शरण्या ही गतवर्षापासून धनुर्विद्या खेळाचा सराव सावेडी येथील भारस्कर मळ्यात चालत असलेल्या स्वराज्य क्रीडा व सामाजिक प्रतिष्ठाण येथे सातत्याने सराव करत आहे. आजपर्यंत दोन राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये तिने जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व केले आहे. तिच्या या यशामध्ये तिच्या पालकांचे मोठे योगदान आहे. शरण्याला नगर जिल्हा धनुर्धारी संघटनेचे सचिव अभिजीत दळवी, डॉ. शुभांगी रोकडे-दळवी यांचे प्रशिक्षण मिळत आहे.