
नगर तालुका : तालुक्यातील विळद शिवारात नारुंडी तलावाजवळील मेंढपाळाच्या वस्तीवर आज पहाटे दीडच्या सुमारास सात ते आठ दरोडेखोरांनी सशस्र दरोडा टाकत दोन महिला व दोन पुरुष अशा चौघांना बेदम मारहाण केली. त्यांच्याकडील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटून नेली.