
राहुरी : वांबोरी येथे आज (गुरुवारी) पहाटे तोंडाला रुमाल बांधून आलेल्या सशस्त्र चार दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. त्यांनी तीन घरांमध्ये धाडसी दरोडे टाकले. घरातील लोकांवर धारदार हत्याराने वार केले. त्यात, एका घरातील तीन जण जखमी झाले. तीनही घरांमधून लाखो रुपयांचा सोने-चांदीचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लुटला. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात चारजणांविरोधात दरोड्याचा गुन्हा नोंदविण्यात आला.