बनावट व्हॅल्युएशन रिपोर्ट बनविणारा गजाआड

आरोपीला ४ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत
Arrested for making fake valuation report
Arrested for making fake valuation report
Updated on: 

अहमदनगर - नगर अर्बन बँकेच्या १५० कोटींच्या फसवणूक प्रकरणात बनावट व्हॅल्युएशन रिपोर्ट तयार करून कर्ज घेतल्याचे उघडकीस आले आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. पोलिसांनी बनावट व्हॅल्युएशन रिपोर्ट तयार करणारा आरोपी मुकेश चंद्रकांत कोरडे (वय ३९, रा. गायके मळा, स्टेशन रस्ता, अहमदनगर) याला अटक केली. त्याला शुक्रवारी (ता. १) दुपारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने ४ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

बँकेच्या २८ संशयास्पद कर्जखात्यांसह बँकेच्या तत्कालीन अध्यक्षांच्या जवळचे असलेल्या सचिन गायकवाड व आशुतोष लांडगे यांनी मिळून बँकेची दीडशे कोटींची फसवणूक केल्याची फिर्याद नगर अर्बन बचाव कृती समितीचे प्रमुख व बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण आव्हाड करीत आहेत. पोलिसांनी सुरवातीला सचिन गायकवाड (रा. कौडगाव, ता. श्रीगोंदे) याला अटक केली. त्यानंतर कर्जप्रकरणाची अनेक रहस्ये बाहेर येत आहेत.

बँकेकडे तारण ठेवलेल्या सुमारे पाच मालमत्तांचे मूल्यांकन जास्त दाखविले होते. यासाठी आरोपी गायकवाडने व्हॅल्युअरच्या बनावट सह्यांसह खोटा रिपोर्ट सादर केला असल्याची बाब पोलिस तपासातून समोर आली. हा बनावट व्हॅल्युएशन रिपोर्ट कोणी तयार केला, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात होता. मुकेश कोरडे याने सदरचा व्हॅल्युएशन रिपोर्ट तयार केल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली. पोलिसांनी कोरडे याला अटक केली आहे.

आरोपी गायकवाड याच्याशी संबंधित कर्ज घेतलेल्या रकमेचा विनियोग झाला आहे. काही रकमा इतर कर्जखात्यांमध्ये वळविल्या आहेत. त्यामुळे संबंधित कर्जखातेदार, संचालकांच्या जवळच्या काही व्यक्ती व काही संचालकही पोलिसांच्या रडारवर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

‘Mula Dam Water,
Balasaheb Thorat and Sujay Vikhe Share the Same Platform
Bhingar Cantonment Development Nilesh Lanke Directs Action on Fort Beautification Lake Cleaning Hospital and Teachers
Bhandardara Dam Centenary Tourism Plan E Tender For Key Sites And Krishnavanti Rest House On 49 Year Lease Announced
Marathi News Esakal
www.esakal.com