
अहमदनगर : केंद्र सरकारने इजिप्तमधून कांदा आयात केला. देशातील प्रमुख शहरांतील बाजारपेठांत हा कांदा आला आहे. नगरच्या बाजार समितीत आज तो आला. त्याचा परिणाम आजच्या कांदा लिलावावर झाला.
राज्यात कांद्याचे भाव अडीच ते तीन हजार रुपयांनी घसरले. काही दिवसांपूर्वी साडेसहा ते सात हजार रुपये क्विंटलने विकला जाणारा कांदा आज साडेतीन ते चार हजार रुपयांनी विकला गेला. केंद्र सरकारच्या धोरणाबाबत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. नगरच्या बाजार समितीत आलेला इजिप्तचा कांदा तीन ते साडेतीन हजार रुपये क्विंटल दराने विकला गेला.
नगर तालुका बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात आज कांदालिलावास सुरवात झाली. खरेदीसाठी आलेले व्यापारी व कांदाविक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांनीही इजिप्तचा कांदा पाहण्यासाठी गर्दी केली होती. आपल्या कांद्यासारखी चव व गंध नसल्याने, खरेदीसाठी आलेल्या व्यापाऱ्यांनी इजिप्तच्या कांद्याकडे पाठ फिरविल्याचे दिसत होते.
नगर तालुका बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे म्हणाले, लॉकडाउनमुळे देशातील शेतकरी मेटाकुटीला आला. अतिवृष्टीचा फटका बसला. त्यातून सावरत नवीन कांदालागवड करण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे. कोरोनानंतर राज्यातील शेतकऱ्यांना कांद्यातून दोन पैसे मिळत होते, तर केंद्र सरकारने इजिप्तच्या कांद्याची आयात केली. केंद्र सरकारने तातडीने कांद्याची आवक थांबवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. देशाला पुरेल इतका कांदा देशात उत्पादित होणार आहे. आपल्याला इजिप्तच्या कांद्याची गरज नाही.
शेतकरी संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी जवरे म्हणाले, कांदा जीवनाश्यक वस्तूच्या यादीत असताना, कांद्याला कधीही हमीभाव मिळाला नाहीत. बाजारात एक रुपये किलोने कांदा विकण्याची वेळ आल्याने, शेतकऱ्यांना कांदे फेकून द्यावे लागले. त्यावेळी कोणत्याही सरकारला शेतकऱ्यांची काळजी वाटली नाही. मात्र, कांद्याचा तुटवडा भासत असल्याचे सांगून परदेशातील कांदा आयात करणारे केंद्र सरकार परदेशातील कांदाउत्पादकांच्या हिताचे आहे.
बाजारातील परिस्थिती
इजिप्तचा कांदा- 300 गोण्या
विक्री ः 74 क्विंटल
भाव (क्विंटलमध्ये)- 3000-3500
राज्यातील कांदा
बाजारभाव (क्विंटलमध्ये)
प्रथम - 3500-4000
द्वितीय- 2700-3500
तृतीय - 1500-2700
गोल्टी- 500-1500
संपादन : अशोक मुरुमकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.