esakal | कला शिक्षक वळाले इलेक्ट्रॉनिककडे; लॉकडाऊनमध्ये शिकले टीव्ही दुरुस्त करायला
sakal

बोलून बातमी शोधा

An art teacher from Bhandardara repaired a TV at home

कोरोनाचे रुग्ण अधिक प्रमाणात वाढत आहेत. लॉकडाऊन सुरु झाल्यापासुन विविध क्षेत्रातील नोकरदार घरात आहेत.

कला शिक्षक वळाले इलेक्ट्रॉनिककडे; लॉकडाऊनमध्ये शिकले टीव्ही दुरुस्त करायला

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : सध्या कोरोनाचे रुग्ण अधिक प्रमाणात वाढत आहेत. लॉकडाऊन सुरु झाल्यापासुन विविध क्षेत्रातील नोकरदार घरात आहेत. त्याच लॉकडाऊनचा उपयोग करत भंडारदरा (ता.  अकोले) येथील कलाशिक्षक दशरथ नवसु खाडे यांनी बंद पडलेला टिव्ही दुरुस्त केला आहे. या मिळालेल्या मोकळया वेळात त्यांनी नवीन शिकण्याचा प्रयत्न केला.

दशरथ खाडे यांना दहावीत असल्यापासून इलेक्ट्रॉनिक साधनांची आवड. त्यांच्याकडे रेडीओचा स्पिकर   खराब झाला होता. स्पिकरचा कागदासारखा असलेला भाग फाटला होता. तो फिटरकडे नेऊन दुरुस्त करायला पाहिजे. त्याचे साहित्य कोठे मिळते याची काहीही कल्पना नव्हती. तरीही त्यांनी वर्तमानपत्राचा कागद घेऊन फाटलेल्या ठिकाणी चिकटविला. आणि रेडीओ सुरु केला. तर त्याच्या आवाजात बदल झाला होता. आवाज एकदम चांगला नाही, पण पहिल्यापेक्षा बरा येत होता.

रेडिओच्या कीटमधील वेगवेगळया पार्टला काय म्हणतात. त्यांचा उपयोग काय आहे. याची काहीही माहिती नव्हती. तरिही त्या किटमध्ये असणाऱ्या डबी स्क्रु ड्रायव्हरच्या सहाय्याने फिरवुन पाहिली तर त्याने रेडिओचे वेगवेगळे केंद्र सेट होतात. अशी माहिती मिळाली. त्यातुनच हळु हळु रेडीओ दुरुस्तीची सुरुवात झाली.

पुणे येथे चित्रकलेचे शिक्षण घेत असताना एफएमला लागणारे सर्व वेगवेगळे साहित्य आणुन  एफएमबनवायला सुरुवात केली. काही मित्रांना एफएमबनवुन दिले. पुढे चित्रकला शिक्षकाची त्यांना नोकरी मिळाली. सध्या कोरोनाचे रुग्ण वाढतच असुन लॉकडाऊन सुरु झाल्यापासुन मोकळा वेळ मिळत आहे. त्याच वेळेचा दशरथ खाडे यांनी फायदा करुन घेतला.

टीव्ही इतर ठिकाणी दुरुस्त करायला नेण्यासाठी गाडया बंद आहेत. घरापासुन रस्त्यापर्यंत न्यायचं म्हटल तरी अवघड. त्यात पावसाळा सुरु, पाऊलवाट शेवाळलेली. शेतातुन गुडघाभर पाण्यातुन जायचं. टिव्हीचं वजनही जास्त. त्यामुळे दुरुस्तीसाठी नेताना घसरुन पडल तर टिव्ही फुटेल व आपल्यालाही लागेल मग करायचे काय? यातून त्यांनी घरीच टिव्ही दुरुस्त केला.

संपादन : अशोक मुरुमकर