जामखेड तहसील कार्यालयासमोर लोककलावंतांचे आंदोलन

वसंत सानप
Sunday, 8 November 2020

ग्रामीण विकास केंद्र, जामखेड, लोकाधिकार आंदोलन आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे आंदोलन करण्यात आले.

जामखेड: विविध मागण्यांसाठी कलावंतांनी तहसील कार्यालयासमोर "वाद्य व बासरी बजाव' आंदोलन केले. 

ग्रामीण विकास केंद्र, जामखेड, लोकाधिकार आंदोलन आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे आंदोलन करण्यात आले. आदिवासी भटके-विमुक्त आघाडीचे राज्य समन्वयक ऍड. अरुण जाधव यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.

लोकाधिकार आंदोलनाचे प्रवक्ते बापू ओहोळ, द्वारका पवार, विशाल पवार, अतीश पारवे, मुकुंद घायतडक, काशीनाथ सदाफुले, बाबाराजे जाधव, भीमा काळे आदींसह कलावंत आंदोलनात सहभागी झाले होते. 

ऍड. जाधव म्हणाले, की कोरोनामुळे कलावंतांवर उपासमारीची वेळ आली. हे प्रसिद्ध कलावंत असतानाही, त्यांना कामासाठी मजुरीलादेखील कोणी घ्यायला तयार नाही. कलावंतांपुढे अनेक प्रश्न ठाम मांडून उभे आहेत. सरकारने या कलावंतांचे व्यवसाय तत्काळ सुरू करून कुटुंबाची उपासमार थांबवावी. 

मनसेचे तालुकाप्रमुख प्रदीप टापरे, नाथपंथी डवरी गोसावी समाजाचे प्रतिनिधी अजिनाथ शिंदे व विद्रोही संघटनेचे देवा देवकर यांनी आंदोलनास पाठिंबा दिला.

ग्रामीण विकास केंद्राचे सचिन भिंगारदिवे, वैजीनाथ केसकर, सागर भांगरे, राकेश साळवे, सुमित येरणे, बाबा पवार, अंकुश पुलावळे आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Artists' agitation in front of Jamkhed tehsil office