आशा कर्मचाऱ्यांची मानधनवाढ तुटपुंजी

आशा कर्मचाऱ्यांची मानधनवाढ तुटपुंजी
Updated on: 

अकोले,  : राज्य सरकारने आशा कर्मचाऱ्यांच्या मानधनात किरकोळ वाढ केली. मात्र, त्यांच्या कामाचे स्वरूप पाहता, दिलेली मानधनवाढ अत्यंत तुटपुंजी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जीव धोक्‍यात घालून काम करणाऱ्यांना किमान 10 हजार रुपये मासिक वेतन व कोरोना साथीच्या सर्वेक्षणाचा प्रतिदिन किमान 300 रुपये मोबदला मिळावा, गटप्रवर्तकांना 25 हजार रुपये वेतन द्यावे, अशी मागणी आशा कर्मचारी संघटनेने केली आहे. 

आशा कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी फेडरेशनच्या झेंड्याखाली एकत्र येत राज्यव्यापी संपाचा इशारा दिला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर "आशा' देत असलेले योगदान मोलाचे आहे. राज्य सरकारने या पार्श्वभूमीवर 25 जून रोजी त्यांच्या मानधनात दोन हजार रुपये व गटप्रवर्तकांच्या मानधनात तीन हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला. 

या निर्णयाची अंमलबजावणी एक जुलैपासून सुरू करण्याची घोषणा झाली. सरकारच्या या निर्णयामुळे "आशां'चे एकूण मानधन 3500 झाले. गटप्रवर्तकांचे मासिक मानधन 11 हजार 500 रुपये झाले. मात्र, "आशा' व गटप्रवर्तकांचे कामाचे स्वरूप पाहता, हे मानधन अत्यंत अन्यायकारक आहे. "आशां'ना यानुसार प्रतिदिन केवळ 116 रुपये मानधन मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

‘Mula Dam Water,
Balasaheb Thorat and Sujay Vikhe Share the Same Platform
Bhingar Cantonment Development Nilesh Lanke Directs Action on Fort Beautification Lake Cleaning Hospital and Teachers
Bhandardara Dam Centenary Tourism Plan E Tender For Key Sites And Krishnavanti Rest House On 49 Year Lease Announced
Marathi News Esakal
www.esakal.com