
सोनई: जगाला ज्ञानाचा संदेश देणाऱ्या अलौकिक ज्ञानेश्वरी ग्रंथाचा जन्म नेवासेत झाल्याचा अभिमान संपूर्ण वारकरी संप्रदायास, तसेच राज्य सरकारला सुध्दा आहे. विश्व कल्याणाची प्रार्थना करताना माउलींनी सर्व जीवमात्रांसाठी पसायदान मागितले असल्याने संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म सप्तशताब्दी सुवर्णमहोत्सव राज्यभर साजरा करण्यात येईल, असा विश्वास राज्याचे सांस्कृतिक व माहिती तंत्रज्ञानमंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केला.