
शिर्डी : मी पन्नास वर्षे काँग्रेस पक्षात होतो. त्यामुळे त्या पक्षावर टीका करणे योग्य नाही. मात्र, काँग्रेस पक्ष दिशाहिन झाला. कार्यकर्त्यांत चैतन्य निर्माण करणारे नेतृत्व नाही. त्यामुळे मातब्बर नेते आणि कार्यकर्ते आपल्या भवितव्याचा विचार करून काँग्रेस पक्ष सोडीत आहेत, असे मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.